Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

भारतरत्न पं भीमसेन जोशी यांच्या आयुष्यावर आधारित काही बंदिशी व त्यांनी आपल्या स्वरांनी अजरामर केलेल्या रचनांचे सादरीकरण

पुणे  : आपले गुरू व वडील भारतरत्न पं भीमसेन जोशी यांवर श्रीनिवास जोशी यांनी रचलेल्या काही बंदिशी व स्वत: पं भीमसेन जोशी यांनी आपल्या स्वरांनी अजरामर केलेल्या रचना यांचे सादरीकरण अनुभविण्याची सुवर्णसंधी पुणेकर रसिक श्रोत्यांना मिळणार आहे.

पुण्यातील अम्युझिका यांच्या वतीने व महिंद्रा फायनान्स यांच्या सहकार्याने ‘सुरस कथा अनंता’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन येत्या ५ जानेवारी रोजी सायं. ६.३० वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम सशुल्क आहे.

विशेष म्हणजे या कार्यक्रमात श्रीनिवास जोशी, पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी, शास्त्रीय गायक अमोल निसळ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे हे पं भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या रचना देखील सादर करतील. कार्यक्रमादरम्यान पांडूरंग पवार तबला तर अविनाश दिघे हे संवादिनीवर साथसंगत करतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading