Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

पुण्‍याच्‍या चार वर्षीय प्रष्‍वी महेश्‍वरीचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्‍ये प्रवेश 

पुणे :हडपसर येथील ग्‍लोबल इंडियन इंटरनॅशनल स्‍कूलच्‍या चार वर्षीय प्रष्‍वी महेश्‍वरीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्‍ये स्‍थान मिळवले आहे. केजी १ च्‍या या विद्यार्थीनीने एका मिनिटामध्‍ये हुला हूपचे सर्वाधिक १७८ स्पिन्‍स करत ही गौरवशाली कामगिरी केली. 

प्रष्‍वीने साडेतीन वर्षांची असतानाच धमाल व खेळ म्‍हणून हूप शिकवण्‍यास सुरूवात केली. त्‍यानंतर तिच्‍या आईवडिलांना समजले की, तिच्‍यामध्‍ये अधिक उत्तम कामगिरी करण्‍याची क्षमता आहे. तिचे कौशल्‍य व आवड पाहून तिच्‍या आईवडिलांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसशी (आयबीआर) संपर्क साधला. तिने दुस-या प्रयत्‍नामध्‍येच रेकॉर्ड मोडला आणि तिला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसकडून प्रमाणपत्र, पदक व बॅचसह गौरविण्‍यात आले. तिच्‍या आईवडिलांनी अभ्‍यासेत्तर उपक्रमांमधील तिच्‍या आवडीला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी शाळेचे आभार मानले.

जीआयआयएसमध्येव्हिज्युअल आणि परफॉर्मिंग आर्टसचे लवकर ज्ञान विद्यार्थ्‍यांना स्‍वत:मधील कलाकाराचा शोध घेण्‍यास मदत करते. यामुळे त्‍यांच्‍यामधील सर्जनशीलतेला चालना मिळण्‍यासोबत चौकटीबाहेरील विचारसरणी व कल्‍पनाशक्‍तीला देखील चालना मिळते.

एक्स्पोजर विद्यार्थ्यांना स्वतःमध्ये कलाकार शोधण्यात मदत करते. हे त्यांच्या सर्जनशीलतेला चालना देते आणि आउट-ऑफ-द-बॉक्स विचार व कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देते. जगभरातील स्मार्ट कॅम्पस विद्यार्थ्यांना कौशल्य विकासासाठी एक व्यासपीठ देण्यावर लक्ष केंद्रित करतात, जे त्यांच्या शैक्षणिक पोर्टफोलिओसाठी अतिरिक्‍त कौशल्‍यांचे ज्ञान देतात.

या बाबत बोलताना ग्‍लोबल इंडियन इंटरनॅशनल स्‍कूलचे (जीआयआयएस) कार्यसंचालनांचे संचालक राजीव बंसल म्‍हणाले, आम्‍हाला प्रष्‍वी महेश्‍वरीने साध्य केलेल्‍या उल्‍लेखनीय कामगिरीचा खूप आनंद होत आहे. जीआयआयएस येथे ९ जेम्‍स अध्‍यापनपद्धतीचा विद्यार्थ्‍यांच्‍या आवडीला दिशा देत, त्‍यांच्‍यामधील क्षमता ओळखत आणि त्‍यांच्‍या विकासाला चालना देत त्‍यांच्‍यामधील सर्जनशीलता व नवोन्‍मेष्‍काराचे संगोपन करण्‍याचा उद्देश आहे. आमच्‍या सर्वांगीण शैक्षणिक दृष्टिकोनाने आम्‍हाला आमच्‍या शिरपेच्‍यात अधिक तु-यांची भर करण्‍यास मदत केली आहे. हे यश त्‍यापैकीच एक आहे आणि आमच्‍यासाठी अभिमानास्‍पद क्षण आहे. जीआयआयएसमधील आम्‍हा प्रत्‍येकाला या सन्‍मानाचा अभिमान वाटतो.

प्रष्‍वीचे वडिलम्‍हणाले, आम्‍हाला आनंद होत आहे की, आमच्‍या मुलीचा तिच्‍यामधील विशेष कौशल्‍यासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसने सन्‍मान केला आहे. आम्‍ही तिच्‍या कौशल्‍याचे कौतुक करतो, ज्‍यामुळे तिला हे सपादन प्राप्त करण्‍यामध्‍ये मदत झाली आहे. तसेच आम्‍ही सतत मार्गदर्शन व प्रोत्‍साहन देण्‍यासाठी जीआयआयएसचे खूप-खूप आभार मानतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading