महाविकास आघाडीने मनमर्जीने अधिवेशनात विद्यापीठ विधेयक पारीत करुन घेतल्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाचे आंदोलन
पुणे : काल महाविकास आघाडी सरकारने स्वतःच्या मनमर्जीने अधिवेशनात विद्यापीठ विधेयक पारीत करुन घेतले. याच्या निषेधार्थ आज भाजप युवा मोर्चाने पुणे विद्यापीठा बाहेर राज्य सरकार विरोधात आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप युवा मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी केले.
या आंदोलनाला भाजप युवा मोर्चाचे शंतनू हटके, अभिजित पवार ,आदित्य जागडे, भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाच्या वेळी महाविकास आघाडी सरकार स्वतःच्या मनाप्रमाणे अधिवेशनात विद्यापीठ विधेयक पारीत केले म्हणून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.
राघवेंद्र बापू मानकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने अधिवेशनात विद्यापीठ विधेयक पारीत करुन घेतले. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने विद्यापीठ विधेयक हा कायदा मागे घ्यावा. हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे म्हणून आज आम्ही राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहोत.
