डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सत्ता आवश्यक -अॅड. संदीप ताजणे
पुणे: भारत बौद्धमय करण्यासाठी राजकीय सत्ता हस्तगत करा एडवोकेट संदीप ताजणे ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड पुणे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1954 रोजी देहूरोड येथे रंगून येथून तमाम बहुजन समाजासाठी बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना या ठिकाणी केली होती या घटनेस 67 वर्ष झालेली आहे आजही या ऐतिहासिक जन्मभूमीच्या विहारासाठी संघर्ष करावा लागतो.
कारण बहुजन समाज सत्तेमध्ये नसल्यामुळे या सर्व घटना गोष्टी घडत आहेत उत्तर प्रदेशामध्ये बहुजन समाज पार्टी चे चार वेळा राज्य निर्माण केल्यामुळे तेथे बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला विद्यापीठ जिल्हे स्मारक विहार महापुरुषांच्या विचारांचा सन्मान त्या ठिकाणी होऊ शकला याचे एकमेव कारण उत्तर प्रदेश मधला बहुजन बांधव सत्तेची चावी घेण्याचं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी संघटित झाला त्याचीच कॉपी आपल्याला महाराष्ट्र मध्ये करावी लागेल देशभरामध्ये करावी लागेल बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न भारत बौद्धमय करण्याचे पूर्ण होऊ शकेल असा आशावाद अॅड. संदीप ताजणे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बहुजन समाज पार्टी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
सदर धम्मभूमी च्या ऐतिहासिक कार्यक्रमाचे संयोजक भिमपुत्र टेक्सास दादा गायकवाड यांनी केले होते.बसपा महाराष्ट्र महासचिव सुदीप जी गायकवाड पुणे जिल्हा अध्यक्ष हुलगेश चलवादी पुणे पुणे जिल्हा प्रभारी रमेश आप्पा गायकवाड जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड पुणे जिल्हा प्रभारी संजय शेंडगे, पुणे जिल्हा महासचिव प्रकाश गायकवाड, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुरज गायकवाड पिंपरी चिंचवड शहर प्रभारी सुशील गवळी, नागसेन माला, गजेंद्र आल्हाट, पुणे जिल्हा सचिव मधुकर इंगळे सुधाकर रामफळे, चंद्रकांत सोनवणे, बन्सी रोकडे आदि मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
