Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

बहुजन समाज पार्टीच्या वतीने संविधान सन्मान सोहळा संपन्न


पुणे : भारतीय सविधानामुळे न्याय , हक्क , व स्वातंत्र्य मिळाले असून त्याचा फायदा सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला विशेषतः महिलांना मोठ्या प्रमाणात झाला असून अनेक महिला स्वाभिमानाने काम करीत आहे याचे सर्व श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधानाला देणे गरजेचे आहे असे मत बहुजन समाज पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केले .

हडपसर येथे बहुजन समाज पार्टी च्या वतीने संविधान सन्मान सोहळ्याचे उदघाटन तसेच महिलांसाठी आयोजित लकी ड्रॉ बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते . यावेळी भारत फोर्स कंपनी जवळ,ढवळे वस्ती व जाधव वस्ती हडपसर येथे नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महा सचिव सुदीप गायकवाड यांनी आपले विचार मांडताना येणाऱ्या मनपा निवडणूकिमध्ये निळा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही असे म्हटले . कार्यक्रमास रमेश गायकवाड ,सागर खंडे ,पंडित साळवी ,बाळासाहेब हतांगडे ,हडपसर विधानसभा अध्यक्ष राजेंद्र राऊत ,अजय सरवदे उपस्थित होते .या कार्यक्रमाचे आयोजन शफीक शेख ,सुनील गवळी यांनी केले. यावेळी उपस्थित महिलामधून भव्य लकी ड्रॉ व मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .लकी ड्रॉ मधून विजयी ठरलेल्या महिलांना टीव्ही , वॉशिंग मशीन ,फ्रीज ,शिलाई मशीन ,मिक्सर ,कुकर ,डिनर सेट आदी बक्षीसे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत देण्यात आले .जवळजवळ पाच हजार महिला यावेळी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading