Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महात्मा गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी कालिचरण महाराजां विरोधात छत्तीसगड येथे गुन्हा दाखल झाला आहे. रायपूरमधील धर्मसंसदेत भाषण करताना कालिचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन केले असून त्यांचा हत्येकारी असलेल्या नथूराम गोडसे याचेही समर्थन केले होते.

कालिचरण महाराज हे मूळचे अकोल्याचे रहिवाशी आहेत.  त्यांचे कुटूंबिय अकोल्यातील शिवाजीनगर  परिसरात राहतात. कालिचरण यांचे मूळ नाव अभिजीत धनंजय  सराग असे असून  कालीमातेचा भक्त असल्याने पुढे त्यांचे नाव ‘कालीपुत्र कालीचरण’ असे पडले. तरुणांमध्ये या महाराजांची मोठी क्रेज आहे.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा – नवाब मलिक 

कालिचरण महाराजा यांनी महात्मा गांधीं विषयी केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याचे पडसाद आज विधानसभेटही उमटले. महात्मा गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी कालिचरण महाराजांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज विधानसभेत केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading