Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

पर्यावरण रक्षण हे राष्ट्रभक्तीचेच एक रूप : डॉ. रामचंद्र देखणे

पुणे : अव्यक्त परमात्म्याचे व्यक्त रूप म्हणजे निसर्गनिगर्स हा ज्ञानमूर्ती आणि महान दाता असून पर्यावरण हेच परमात्म्याचे अंगण तर निसर्ग घटकांचे साजिवंतपण हेच विश्वाचे चैतन्य होयपर्यावरण रक्षण हे राष्ट्रभक्तीचेच एक रूप आहेराष्ट्रनिष्ठेचा उगम हा भूमीनिष्ठेतून झाला आहेकर्तव्यधर्मसंस्कृती आणि मातृभूमीवरील निष्ठा एकरूप झाल्याशिवाय राष्ट्रभक्ती ही संकल्पना रुजत नाहीनिसर्गाकडे पाहण्याची एक कृतज्ञ दृष्टी हवी अन् निसर्गाशी भावनिक नाते जडायला हवेअसे विचार संतसाहित्याचे  लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासकज्येष्ठ साहित्यिक आणि राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉरामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आज (दि. 26 डिसेंबर 2021) पुण्यात एकदिवसीय चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेसंमेलनाचे उद्घाटन पर्यावरणप्रेमी आणि ज्येष्ठ समाजसेविका स्वयंप्रभादेवी मोहितेपाटील यांच्या हस्ते झालेसंमेलनाचे संयोजक ट्रस्टचे विश्वस्तदेशभक्तकोशकार चंद्रकांत शहासनेस्वागताध्यक्ष ज्येष्ठ लेखक  विचारवंतयशदाचे प्रशासकीय अधिकारी डॉबबन जोगदंडवनसंरक्षक रंगनाथ नाईकडेॅडनंदिनी शहासनेडॉजयश्री तोडकरसाहित्यिक श्याभ भुर्केविभागीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले आदी विचारमंचावर होतेकार्यक्रमाची सुरुवात हरिपाठे झालीहरिपाठाचे गायन श्रीपाद कोंडेदेशमुखगायत्री कोंडेदेशमुखमंदार गोखले यांनी केले.

डॉदेखणे म्हणालेनिसर्गातील सारेच घटक मानवाला काहीतरी देण्यासाठी सदैव तत्पर आहेतभारतात अनंत काळापासून चालत आलेली कृषिसंस्कृती आणि दुसरीकडे तत्त्ववेत्यांनी सांगितलेले पंचमहाभूतांचे महत्त्व या दोहोतून पर्यावरण जागृतीचा विचार प्रकर्षाने मांडला गेलापरंतु आधुनिकीकरणाच्या आणि नागरीकरणाच्या प्रक्रियेत निसर्गघटकांवर आघात होत गेलेत्यामुळे मानवी जीवनाचे नैसर्गिक साधेपण आणि संवाद हरवला.

संतांनी वृक्षवल्लीवर्षामेघनदीअरण्ये या सार्या घटकांना कधी सिद्धांतदृष्टांतउपमा तर कधी रूपक स्वरूपात मांडून ‘संत साहित्य पर्यावरण विचार’ हे स्वतंत्र दालन उभे केले आणि बाह्यतत्त्व निरुपणाइतकेच निसर्गपर्यावरणाचे संकीर्तन त्यातून घडले.

कर्तव्यधर्मसंस्कृती आणि मातृभूमीवरील निष्ठा एकरूप झाल्याशिवाय राष्ट्रभक्ती रुजत नाही ही संकल्पना सर्वात प्रथम भगवान श्रीकृष्णाने मांडलीमहाभारत युद्धानंतर या राष्ट्रनिष्ठेच्या जोरावर सार्वभौम सत्ता अस्तित्वात आलीराष्ट्रभावना जागृत ठेवून लोकजीवनात राष्ट्रभक्तीचे चैतन्य जागविण्याचे महत् कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात उभे राहिलेभाषा आणि संस्कृतीची अस्मिता हे राष्ट्रभक्तीचे महत्त्वाचे घटक आहेतकारण भाषा ही शब्दांच्या अंगाने वसत असते तर संस्कृतीच्या अंगाने ठसत असतेएकीकडे भारताला लाभलेल्या सांस्कृतिक वैविध्याशी एकरूप होणे आणि दुसरीकडे पर्यावरणाचे संतुलन राखणे याची जाणीव या राष्ट्रभक्ती संमेलनातून उभी राहत आहेअसे गौरवोद्गार डॉदेखणे यांनी काढले.

उद्घाटक स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील म्हणाल्याराष्ट्रात राहून सामाजिक जाणिवा जपणे गरजेचे आहेप्रत्येकाने किमान पाच झाडे लावावीत  तसेच त्यांना स्वत:च्या मुलांप्रमाणे वाढवावेअसे आवाहन केलेसख्खी मुले आपल्याला सावली देतील की नाही याची शाश्वती नाही पण आपण लावलेली झाडे संवर्धन केली तर ती नक्कीच आपल्याला सावली देतीलपाण्याचा वापरसीडबँकदेशी वाणाचे जतन करणे याविषयी त्यांनी आवाहन केले.

स्वागताध्यक्ष डॉबबन जोगदंड म्हणाले पर्यावरण म्हणजे जीवन आहेत्याचा जागर होणे गरजेचे आहेआपल्या प्रत्येकाच्या मनात असलेली राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लागावी यासाठी अशा स्वरूपाची साहित्य संमेलने नियमितपणे व्हावीत तसेच वृक्षसंवर्धननिसर्गसंवर्धन याविषयीचे साहित्य निर्माण व्हावे.

नाईकडे म्हणालेप्राणवायू हा सजीवाचा पहिला आणि शेवटचा मित्र असतोतो आयुष्यभर सतत साथ देतोतो जीवनाचा अविभाज्य भाग आहेभगवंताने निर्माण केलेली ऑक्सिजनची फॅक्टरी सुरू ठेवण्यासाठी वृक्ष लागवडवृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे

तिसर्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉजयश्री तोडकर यांनी डॉरामचंद्र देखणे यांच्याकडे संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविलीवृक्ष लागवडवृक्ष संवर्धन आणि पर्यावरण रक्षण ही देखील राष्ट्रभक्तीच आहेअसा व्यापक विचार समाजामध्ये रुजविणे आणि त्याविषयी जनजागृती करणे या उदात्त हेतूने दरवर्षी संमेलनाचे आयोजन केले जात असल्याचे संमेलनाचे संयोजक चंद्रकांत शहासने यांनी नमूद केलेभविष्यातील ट्रस्टतर्फे राबविण्यात येणार असलेल्या योजनांची माहिती दिली.

उपस्थितांचे स्वागत डॉजयश्री तोडकरमंजिरी शहासनेॅडनंदिनी शहासनेविद्याधर चव्हाणचंद्रकांत शहासने यांनी केले.

महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर वृक्षदिंडी काढण्यात आलीयात मान्यवरांसह शालेयमहाविद्यालयीन विद्यार्थी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी झाले होतेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading