fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

साहित्यिकांनी दबाव झुगारून भूमिका घ्यावी – डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले

पुणे : केशव सुतांनी फुंकलेली तुतारी आजूनही सुरू आहे. मग आम्ही महात्मा फुले यांच्या अखंडाचे करायचे काय? हा प्रश्न निर्माण होतो. साहित्य, कलेच्या क्षेत्रात भूमिका घेताना मान्यवरांचा, वारिष्ठांचा दबाव असतो. तो झुगारून देणे महत्वाचे, असे मत ज्येष्ठ लेखक आणि माजी संमेलनाध्यक्ष डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.
यशवंतराव दाते स्मृती संस्थेतर्फे डाॅ. भा.ल.भोळे आणि डाॅ. यशवंत स्मृती पुरस्करा 2020 आणि 2021 चे आज डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते वितरण झाले त्यावेळे ते बोलत होते.डाॅ.भा.ल.भोळे आणि डाॅ.यशवंत सुमंत परिवाराच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, विजया भोळे, आणि माधुरी सुमंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदिप दाते, यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.शेख हाशम, पुरस्कार समिती सदस्य किशोर बेडकिहाळ आदी मान्यवर उपस्थित होते.वर्ष 2020 आणि 2021 वर्षासाठीचा डाॅ. भा.ल.भोळे स्मृती वैचारिक ग्रंथ पुरस्कार अनुक्रमे डाॅ. राजा दीक्षित लिखित प्रार्थना समाजाचा इतिहास आणि ज्येष्ठ विचारवंत आणि शास्त्रज्ञ डाॅ. दत्तप्रसाद दाभोळकर लिखित स्वामी विवेकानंदांची खरी ओळख ग्रंथाना देण्यात आला. डाॅ. भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी अनुक्रमे सुरेश सावंत आणि ज्येष्ठ अभ्यासक पर्यावरणवादी कार्यकर्ते लेखक अतुल देऊळगावकर यांना प्रदान करण्यात आला.यावेळी डाॅ.यशवंत सुमंत स्मृती जीवनगाैरव पुरस्काराने 2020 आणि 2021 वर्षासाठी अनुक्रमे वैचारीक क्षेत्रात माैलिक योगदना देणारे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डाॅ. सु.श्री. पांढरीपांडे आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आणि अभ्यासक दत्ता देसाई यांना गाैरविण्यात आले.डाॅ.यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधक प्रेरणा पुरस्कारासाठी 2020 आणि 2021 वर्षासाठी अनुक्रमे केरळचे डाॅ. चिन्मय धारुरकर आणि युवा समीक्षक आणि व्यासंगी अभ्यासक डाॅ.गजानन अपिने यांना सन्मानित करण्यात आले.
डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले, आज गांधींचे नाव काढले की काही लोक नाराज होतात. मात्र त्याचवेळी त्यांना दुसऱ्या गटात ओढण्याचा प्रयत्न केला जातो. महात्मा फुले आणि भगतसिंग यांचा अपवाद वगळता सर्वांनाच दुसरीकडे ओढण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यामुळेच संशोधन करणे आवघड झाले आहे. भारताची पायाभरणी करणाऱ्या पंडीत नेहरूंचे विद्रूपीकरण सुरू आहे. आज सत्य आणि असत्य याचे भान समाजाला येवू नये, अशी परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली जात आहे. आयटी तर सेल कुत्री भूंकावी असा अंगावर येत आहे, अशी टीकाही डॉ. कोत्तापल्ले यांनी यावेळी केली.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, बहुतांश वेळा पुरस्कार हे उतार वयातच मिळतात त्यामुळे त्याचा मनसोक्त आनंद घेता येत नाही. पुरस्कार हे वारीतील वाटेवरच्या प्रसादा सारखे असतात. प्रसाद मिळाला तरी पावल थांबत नाहीत पण पायातील बळ वाढतं. पुरस्कारांचही तसच आहे. आज आकाराणच समाज आणि साहित्य यामध्ये एक दरी निर्माण झाली आहे. साहित्याचा संबंध हा केवळ वाचक आणि लेखका पुरता मर्यादीत नसतो. त्याच्या पुढे जाऊन साहित्यिक समाजासाठी काय करू शकतो याचा आदर्श आपल्या पूर्वजांनी आपल्याला घालून दिला आहे. मात्र आजचे लेखक हे विसरत चालले आहेत. आपण आपल्या सामाजिक प्रश्नांसाठी वेळ देणं प्रसंगी भूमिका घेण म्हणजे आपला सर्जनशील वेळ वाया घालवणं, अशा भ्रमात सध्या लेखक वावरतायेत. साहित्य आणि चळवळ यांचे संबंध दुरावत आहेत. तसेच मध्यमवर्गीय समाज चळवळी पासून दूर चालला आहे. यामुळे समाजात काही झुंडी निर्माण होत आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading