Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

हिवाळी अधिवेशन – चहापानाला मुख्यमंत्री अनुपस्थित

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन- २०२१च्या पूर्वसंध्येला सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मंत्रिमंडळ सदस्यांसमवेत चहापानाचा कार्यक्रम झाला.  तत्पूर्वी अतिथीगृहातील समिती कक्षात विधिमंडळ सदस्य शेकापचे जयंत पाटील, लोकतांत्रिक जनता दलाचे कपिल पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रारंभी स्वागत केले.

चहापान कार्यक्रमात मंत्रिमंडळातील सदस्य सर्वश्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, अशोक चव्हाण, सुभाष देसाई, दादाजी भुसे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, गुलाबराव पाटील,अस्लम शेख, उदय सामंत, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, राज्यमंत्री शंभूराज देसाई, तसेच विधिमंडळ सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading