Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

सत्यवान सावित्रीची कथा आता पहा लवकरच छोट्या पडद्यावर

महाराष्ट्राला अनेक सण, व्रत-वैकल्य यांची संस्कृती लाभली आहे. त्यातील सौभाग्यवती महिलांचं सौभाग्य साजरं करणारा लोकप्रिय सण म्हणजे – वटपौर्णिमा. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. वटपौर्णिमेच्या व्रतामागे सत्यवान आणि सावित्री यांच्या प्रेमाची, निष्ठेची कथा आहे. हि कथा वर्षानुवर्षे आपण ऐकत आलो आहोत. आता हीच कथा मालिकेच्या स्वरूपात प्रेक्षक लवकरच पाहू शकतील. झी मराठीवर सत्यवान सावित्री हि पौराणिक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेच्या प्रोमोची झलक नुकतीच प्रेक्षकांनी वाहिनीवर पाहिली आणि त्याने प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता अजूनच वाढली आहे. या मालिकेत कोण कलाकार असणार आहेत ही माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे. पौराणिक कथा या आपल्याला आपल्या मुळांशी जोडून ठेवण्यात खूप मोठं योगदान देतात त्यामुळे अशीच एक उत्तम पौराणिक मालिका – सत्यवान सावित्री ही झी मराठीवर सादर होणार असल्यामुळे प्रेक्षकांनी मालिकेबद्दल आतुरता व्यक्त केली आहे. ही मालिका लवकरच वाहिनीवर प्रदर्शित होणार असून त्यात सत्यवान आणि सावित्रीची प्रमुख भूमिका कोण निभावणार हे पाहणं औस्त्युक्याच ठरेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading