Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

लक्ष्यच्या अध्यक्षपदी सत्येन पटेल यांची निवड

पुणे : सह्याद्री इंडस्ट्रीजचे प्रमुख सत्येन पटेल यांची क्रीडा स्वयंसेवी संस्था असलेल्या ‘लक्ष्य’च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर एमएसएलटीएचे  मानद सचिव व एआयटीएचे सहसचिव सुंदर अय्यर यांची सचिवपदी 2021 ते 2024 या कालावधीसाठी फेरनिवड करण्यात आली.

लक्ष्यच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 11 कार्यकारी समिती सदस्यांची2021 ते 2024 या कालावधीसाठी 
ही निवड करण्यात आली. स्वस्तिक सिरसीकर आणि आशिष देसाई यांची उपाध्यक्षपदी तर अनिल छाजेड  यांची सहसचिवपदी व भरत शहा यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय इतर निवड झालेल्या सभासदांमध्ये विशाल चोरडिया, ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे,  गिरीश चितळे  यांचा समावेश आहे. यावेळी हर्षल मोर्डे, संदिप नुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय खेळ पुरस्काराने सम्मानीत लक्ष्य ही संस्था खेळाडूंची गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे व त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी 11 वर्षापुर्वी लक्ष्य या संस्थेची स्थापना करण्यात आली.  खेळाडूंना आपले ध्येय साध्य करण्यासाठी मदत मिळावी 
असा या संस्थेचा हेतू आहे.

सध्या विविध क्रीडा प्रकारातील  26  खेळाडूंना ‘लक्ष्य’चा पाठिंबा असून यांतील लक्ष्यच्या 6 खेळाडूंनी ऑलंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच, कुमार व वरिष्ठ गटातील 20 हुन अधिक खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धा व कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
सध्या लक्ष्यने विविध वयोगटातील 30 हुन अधिक राष्ट्रीय खेळाडूंना पाठिंबा दिला आहे. आम्ही 2024 ऑलंपिकचे लक्ष निश्चित केले असून किमान 15 खेळाडू तरी आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करतील आणि भारताला

ऑलंपिक पदक मिळवून देतील, असे लक्ष्यचे नवनिर्वाचीत अध्यक्ष सत्येन पटेल यांनी सांगितले.


2021-2024 वर्षासाठी नवीन व्यवस्थापकीय समिती खालीलप्रमाणे-
आजीव अध्यक्ष-  मनिष जैन
अध्यक्ष- सत्येन पटेल
उपाध्यक्ष- स्वस्तिक सिरसीकर, आशिष देसाई
सचिव – सुंदर अय्यर
सहसचिव- अनिल छेजेड
खजिनदार- भरत शहा
कार्यकारिणी सभासद- विशाल चोरडीया, ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे,  गिरिष चितळे
अन्य मान्यवर- हर्षल मोर्डे, संदिप नुलकर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading