आरोग्य विभागातील १९९ कर्मचाऱ्यांना मुदत वाढ
पुणे: कोविडच्या संभाव्य तिसर्या लाटेची तयारी आणि लसीकरणासाठी आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणार्या कर्मचार्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, फीजिशियन, अतिदक्षता विभाग फीजिशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहायक अशा १९९ कर्मचार्यांना मुदत वाढ देण्यात आली आहे. या आधी २११ कर्मचार्यांना मुदत वाढ देण्यात आली होती.
रासने पुढे म्हणाले, आरोग्य विभागात वर्ग एक ते चारच्या ११७८ पदांना मान्यता आहे. परंतु सध्या ८२३ कर्मचारी कार्यरत असून ८५५ पदे रिक्त आहेत. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर ही पदे भरता येतील
