कात्रज-आंबेगाव परिसरातील पाणीपुरवठ्याची समस्या सुटणार
पुणे:कात्रज येथील संतोषनगर आणि आंबेगावातील पोतदार शाळेसमोर जलवाहिनी क्रॉसिंग करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे परवाना शुल्क आणि अनामत रक्कम म्हणून तेरा लाख तीस हजार रुपये हस्तांतरित करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, या निर्णयामुळे कात्रज-आंबेगाव परिसरातील पाण्याच्या चार टाक्या भरणार आहेत. त्यामुळे कात्रज, आंबेगाव परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे.
