विरोधकांना अमित शहांच्या कार्यक्रमाला येण्यापासून रोखलं :विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ
पुणे: पुणे महानगरपालिकेमधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भुमिपुजन समारंभ केंद्रीय गृह मंत्री .अमित शहा यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते परंतु पास मात्र कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजे आज सकाळी अकरा वाजता घरी मिळाले. हे पास दिल्यानंतर काही वेळाने महापौर कार्यालयातून निरोप आला की कार्यक्रमाला येताना कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट करून येणे आवश्यक आहे व तशा प्रकारचे रिपोर्ट देणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले. खर तर ऐनवेळेस सत्ताधारी भाजप ने केलेले गलिच्छ राजकारण आहे. आधीच या दोन महापुरुषांचे फोटो जाहिराती मध्ये न टाकुन एक प्रकारचा अवमान केले आहे. आणि विरोधकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहूच नये अशा प्रकारची ऐनवेळेस नियोजन केले आहे.कोरोना टेस्ट करून घ्यायची बंधनकारक होते तर यासंबंधी ची सुचना दोन तिन दिवस अगोदर देणे आवश्यक होते. ही टेस्ट केल्यानंतर साधारण चोवीस तासांनी रिपोर्ट मिळतो याची जाणीव असताना सुध्दा सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला का सुचना दिल्या नाहीत.
हे जाणीवपूर्वक केले कृत्य आहे. या भाजपच्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. महापालिकेच्या एका चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला इच्छा असताना हजर राहता आले नाही.भाजप ने स्वत:च्या पक्षाचा अजेंडा राबवून कार्यक्रम केला. अशी टीका विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली.
