fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा कायम राहणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. महाराष्ट्र सरकार कुठे आहे? असा खोचक सवाल करतानाच हे तीन चाकी ऑटो रिक्षा सरकार आहे आणि आता या ऑटोची चाकं पंक्चर झाली असल्याचा हल्लाबोल शाह यांनी केलाय. त्यावेळी त्यांनी पुणे महापालिकेवर भाजपचा झेंडा कायम राहणार असल्याचा दावाही केलाय. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी विविध कार्यक्रम केल्यानंतर आज भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. तेव्हा त्यांनी मार्गदर्शन कार्यकर्त्यांना केले तेव्हा ते बोलत होते .

या मेळाव्याला भाजपचे आमदार व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, आमदार मुक्ता टिळक केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते.

अमित शहा म्हणाले ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. त्यांची तब्येत ठिक नाही. पण जेव्हा ठिक होती तेव्हा तरी कुठं बोलले. मी प्रार्थना करतो की त्यांची तब्येत ठिक व्हावी. महाराष्ट्रातील सरकार कुठे आहे? लोक शोधत आहेत, अशी टीका गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली .
अमित शहा म्हणाले 2019 ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. पण नंतर उलटले. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांनी आमच्यासोबत विश्वासघात केला, असा गंभीर आरोप अमित शाह यांनी महा विकास आघाडी सरकारवर केला. सरकारची 3 चाकी रिक्षा चालते तेव्हा प्रदूषणाशिवाय काही बाहेर पडत नाही’
महाराष्ट्रातील सरकार तीन चाकाची रिक्षा आहे. या रिक्षाचे तिन चाकं तीन दिशेला आहेत. अन आता तिन्ही चाकं पंक्चर झाली आहे. जेव्हा ही रिक्षा चालते तेव्हा प्रदूषणाशिवाय काहीही बाहेर पडत नाही, अशी टीकाही शाह यांनी यावेळी केलीय. येणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीत लक्ष्य कमी ठेवू नका. पुण्यातील जनता तुम्हाला भरभरुन द्यायला तयार आहे, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading