गोंडवाना विद्यापीठ कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना अभाविपने दिल्या शुभेच्छा
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद द्वारे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद क्षेत्रीय संघटन मंत्री देवदत्तजी जोशी,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत संघटन मंत्री विक्रमजीत कलाने, विद्यापीठ विकास मंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम.डी. पाटील सर,उत्तर महाराष्ट्र जळगाव विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन बारी सर ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरचे व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू जी चांगदे, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे अधिसभा सदस्य संदीप लांजेवार, संदीप पोशट्टीवार, संजय रामगिरीवार, प्रशांत दोनतुलवार, अजय काबरा, मनीष पांडे, विभाग संघटन मंत्री शक्ती केराम आदी उपस्थित होते.
