भीमथडी जत्रा 22 ते 27 डिसेंबर दरम्यान
पुणे : ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीची जत्रा म्हणजे भीमथडी जत्रा. भीमथडी जत्रा मागील 15 वर्षापासून पुण्यात ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संस्थेच्या वतीने भरवली जाते. यावर्षीदेखील कोरोनाचे सर्व नियम पाळून येत्या 22 ते 26 डिसेंबरपर्यंत ही जत्रा भरणार आहे. पुणे येथील कृषी महाविद्यालय मैदान, सिंचन नगर रेंज हिल कॉर्नर, शिवाजीनगर येथे ‘भीमथडी जत्रा 2021’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती च्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला सई पवार उपस्थित होत्या.
सुनंदा पवार म्हणाल्या, महिला बचत गटाचे दर्जेदार उत्पादन ,हस्तकला, वस्तू महाराष्ट्राचे अस्वल खाद्यपदार्थ आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन या सर्व गोष्टींचा एकाच छताखाली पुणेकरांना आनंद घेता येतो म्हणून भीमथडी जत्रेला गेली पंधरा वर्षे पुणेकारानी प्रचंड प्रेम दिले. याचेच फळ म्हणून
पंधरा वर्षात 8500 पेक्षा जास्त महिला बचत गट यात सहभागी झाले. नवीन जोडले जात आहेत.
भीमथडी जत्रेसाठी कोरोनाचे नियम
कोरोना आणि ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर भीमथडी जत्रेसाठीही कोरोनाचे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार दोन लसीचे डोस घेतलेल्या व्यक्तींनाच येथे प्रवेश दिला जाणार आहे. तसेच ओळखपत्र, माक्स असणाऱ्यांनाच या जत्रेचा आनंद घेता येईल.
