Wednesday, September 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बंगळुरूत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना;कोल्हापूर, बेळगाव, मिराजेत पडसाद

कोल्हापूर : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना गुरूवारी रात्री (16 डिसेंबर) उशिरा घडली. यांचे तीव्र पडसाद कालपासून महाराष्ट्रात उमटत आहेत. आज (18 डिसेंबर) कोल्हापूरात शिवसेनेच्या वतीने महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. तर बेळगाव शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून 144 कलम लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्रात आज या घटनेच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येत आहेत.

बेळगावात तणावपूर्ण परिस्थिती

बंगळुरूतील या घटनेचा व्हिडिओ काल (17 डिसेंबर) सोशल मीडियावर आगी सारख्या पसरला. त्यानंतर बेळगाव, कोल्हापूर भागात नागरिकांनी या घटनेविरोधात रसत्यावर उतरत संतप्त भावना व्यक्त केल्या. काल (17 डिसेंबर) बेळगाव शहरात धर्मवीर संभाजीराजे चौकात शेकडो तरुण एकवटले होते. यावर रस्त्यावर उतरत घोषणा देणाऱ्या 27 जणांना आज ताब्यात घेण्यात आलेअसून त्यांची रवानगी आता हिंडलगा कारागृहात करण्यात आली. बेळगावात सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. पोलिसांनी शहरात 144 कलम लागू केले आहे. शनिवारी सकाळी 8 ते रविवार सकाळी 6 वाजेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आली आहे.

कोल्हापूरात महामार्ग रोको आंदोलन 

बंगळूर येथील घटनेच्या निषेधार्थ आज (18 डिसेंबर)  शिवसेनेच्या वतीने महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सकाळी बरांचवेळा कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या व महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या गाड्या थांबवण्यात आले.

मिरजमध्ये कर्नाटकातील गाड्यांची तोडफोड 

सांगली येथील मिरजेतही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. यावेळी मिरजेत कर्नाटकातील काही खासगी गाड्यांची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली. तसेच कानडी भाषेत लिहिलेल्या फलकांचीही तोडफोड करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading