Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशन चा दणका

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्र च्या संपुर्ण महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या PTS कर्मचारी यांचेवर होत असलेल्या अन्याया बाबत रिपब्लीकन एम्प्लॉइज फेडरेशन गेले महिना भर लढा देत आहे. या मागासवर्गीय आणि इतर सर्व कर्मचारी यांना नोकरीची हमी वाटत नव्हती परंतु आमच्या लढ्या मुळे मुजोर प्रशासनाला नमते घ्यावे लागले व अखेर प्रशासनाला आमचे सोबत चर्चेसाठी बसावे लागले यावेळी आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे ही आग्रही मागणी केली आणि आमच्या मागण्यांच्या पत्राचे लेखी उत्तर द्यावे असे सांगितले अन्यथा आम्हाला मा रामदासजी आठवले साहेब यांचे आदेशाने मोठे आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला.

यावर प्रशासन सकरात्मक प्रतिसाद देत आहे. या प्रसंगी रिपब्लीकन एम्प्लॉइज फेडरेशन चे केंद्रिय सचिव मा आत्माराम पाखरे , आर पी आय चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, आर पी आय फेडरेशन राष्ट्रीय निमंत्रक तथा कायदेशीर सल्लागार ॲड मंदारभाऊ जोशी, फेडरेशन चे प्रदेश उपाध्यक्ष मा अशोक कांबळे, आर पी आय सांगली जिल्हा अध्यक्ष  संजय कांबळे, फेडरेशन चे प म सचिव मा श्याम सदाफुले, फेडरेशन चे प म उपाध्यक्ष  सुशील सर्वगोड, अशोक गुणगे आणि बँक कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading