पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत एमसीए वेस्ट झोन व युनायटेड स्पोर्ट्स अकादमी यांच्यात अंतिम लढत
ओमकार मोहिते, रणजीत निकम, सौरभ सिंग विजयाचे शिल्पकार
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत रणजीत निकम(126धावा) याने केलेल्या शतकी खेळीसह डावखुरा फिरकी गोलंदाज ओमकार मोहिते(5-80)याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर एमसीए वेस्ट झोन संघाने ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी संघाचा 115 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या सामन्यात सौरभ सिंग(5-30) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने डेक्कन जिमखाना संघावर 8 गडी राखून विजय मिळवत दिमाखात अंतिम फेरी गाठली.
पूना क्लब क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या लढतीत तिसऱ्या दिवशी ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी संघाच्या17षटकात 2बाद 80धावापासून आज खेळ सुरू झाला. तत्पूर्वी पहिल्या डावात ब्रिलीयंट्स क्रिकेट अकादमीने एमसीए वेस्ट झोन संघाविरुद्ध 7धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात एमसीए वेस्ट झोन संघाने फलंदाजी करताना 57षटकात 8 गड्याच्या बदल्यात 383धावा करून आपला डाव घोषित केला. विजयासाठी 376 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स अकादमी संघाचा डाव 57.3षटकात 261 धावांवर संपुष्टात आला.यात साहिल औताडे 49, राज अवतारमणी 49, ऋषिकेश सपकाळ 45, आदर्श बोथरा 24 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. एमसीए वेस्ट संघाकडून ओमकार मोहितेने 80धावात 5 गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ओमकारला अजित बागाडीने 61धावात 3गडी, तर क्षितिज पाटील(1-58), प्रथमेश बाजारी(1-29) यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून सुरेख साथ देत संघाला 115धावांनी विजय मिळवून दिला. सामनावीर ओमकार मोहिते ठरला.
लोणी मैदानावरील तीन दिवसीय सामन्यात दुसऱ्या दिवशी 30.2 षटकात 3 बाद 127 धावापासून खेळ सुरू झाला. तत्पूर्वी पहिल्या डावात डेक्कन जिमखाना संघाचा डाव 44.4षटकात सर्वबाद 147धावावर संपुष्टात आला. याच्या उत्तरात युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने 62.1षटकात 239धावा करून संघाला 92 धावांची आघाडी मिळवून दिली. यात सौरभ सिंग 48,अद्वैय शिधये 47, संदीप शिंदे 36,ओमकार मोहोळ 34, प्रद्युम्न महाजन 28यांनी धावा केल्या. डेक्कन जिमखाना कडून जलदगती गोलंदाज प्रकाश चौधरीने 21 धावात 6 गडी बाद करून युनायटेड स्पोर्ट्स अकादमी संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. पहिल्या डावात 92धावांची आघाडी मिळविलेल्या युनायटेड स्पोर्ट्स अकादमीच्या सौरभ सिंग(5-30)याने सुरेख गोलंदाजी करत डेक्कन जिमखाना संघाला 39षटकात 135धावावर रोखले.यात अनिश करंदीकर 34, यश बोरामनी 23, अभिषेक ताटे 19, सोहम कुमठेकर 18 यांनी थोडासा प्रतिकार केला. विजयासाठी 43 धावांचे आव्हान युनायटेड स्पोर्ट्स अकादमी संघाने 6.4षटकात 2बाद 44धावा करून पूर्ण केले. यात प्रद्युम्न महाजनने नाबाद 21, ओमकार मोहोळ नाबाद 6धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर सौरभ सिंग ठरला.
