Monday, June 22, 2026
ENTERTAINMENTLatest News

अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा कोरोना पॉझिटिव्ह

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान ( Actress Kareena Kapoor )आणि अमृता अरोरा (Amrita Arora) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (corona positive) आली आहे. दोघीही कोविड नियमांचे उल्लंघन करत अनेक पार्टी मध्ये सहभागी झालेल्या होत्या.  या दोघीच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आरटी-पीसीआर चाचणी घेण्याचे आदेश मुंबई महापालिकेने जारी केले आहेत. 

करीना कपूर खान आणि अमृता अरोरा या चांगल्या मैत्रिणी आहेत आणि दोघे अनेकदा पार्टी करताना दिसतात. करीना कपूर आणि अमृता अरोरा नुकत्याच रिया कपूरच्या पार्टीत दिसल्या होत्या. या पार्टीत मलायका अरोरा, करीना, अरिता आणि मसाबा गुप्ता देखील दिसल्या होत्या. याआधी करण जोहरच्या घरी ‘कभी खुशी कभी गम’च्या 20 वर्षांनिमित्त पार्टी झाली होती. मलायका अरोरा, आलिया भट्ट, करिश्मा कपूर, अर्जुन कपूर आणि अमृता अरोरा या पार्टीत सहभागी झाले होते. सोशल मीडियावर अमृता आणि करीनाचे एकत्र मस्ती करतानाचे अनेक फोटोज समोर येत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading