दहावी बोर्ड परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदत वाढ
पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. या मुदत वाढीमुळे विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 20 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन ही मुदत वाढ देण्यात आली आहे. या नियमित शुल्कानुसार विद्यार्थ्यांना येत्या 20 डिसेंबर 2021पर्यंत तर विलंब शुल्कासह 21 डिसेंबर 2021पर्यंत अर्ज करता येणार आहे. या कालावधीत माध्यमिक शाळेद्वारेच फॉर्म भरावेत, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे. माध्यमिक शाळांमध्ये सरल डेटाबेसवरून नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत. अर्ज केल्यानंतर 2 जानेवारीपर्यंत 2022 शाळा विद्यार्थ्यांची चलन डाऊनलोड करून बँकेत शुल्क भरू शकतात. शाळांनी माध्यमाकडे प्री – लिस्ट जमा करण्याची अंतिम मुदत 4 जानेवारी 2022 पर्यंत आहे.
