Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

विद्यापीठातील ‘डिग्री प्लस’ च्या नावनोंदणीला सुरुवात

पुणे : पदवीचे शिक्षण घेत असताना पदवीबरोबरच संबंधित विषयातील अद्यायावत ज्ञान व कौशल्ये विद्यार्थ्यांना मिळावी या दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘डिग्री प्लस’ हा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या ‘डिग्री प्लस’ ऑनलाईन व्यासपीठावर विद्यार्थ्यांच्या नावनोंदणीला आता सुरुवात झाली आहे. अभ्यासक्रमाच्या तारखा संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत.

अनेक शैक्षणिक संस्था, कंपन्या, विशेष शिक्षण देणाऱ्या संस्था अशा अनेक संस्थांबरोबर करार करत जवळपास 130 नवे अभ्यासक्रम याअंतर्गत सुरू केले आहेत. यामध्ये एडब्लूएस अकॅडमी, ईडीएक्स, सिम्प्ली लर्न, ई कीडा, सेलिब्रिटी स्कुल, कॅटलिस्ट वेल्थ, हार्वर्ड बिझिनेस ऑनलाईन अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे. यातील काही अभ्यासक्रम हे निशुल्क आहेत तर काही अभ्यासक्रम कमी किंमतीत उपलब्ध आहेत.

नावनोंदणी कुठे करायची 
‘डिग्री प्लस’साठी http://degreeplus.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करता येईल. येथे अभ्यासक्रम, त्याचा कालावधी, फी व इतर माहिती उपलब्ध आहे. सुरुवातीच्या काळात हे अभ्यासक्रम केवळ विद्यापीठ व विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना करता येणार आहे.

सेलिब्रिटी देणार धडे
सेलिब्रिटी स्कुल अंतर्गत चालणाऱ्या अभ्यासक्रमात आशा भोसले या संगीताचे, नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनयाचे, मधुर भांडारकर दिग्दर्शनाचे, सबिरा मर्चंट कम्युनिकेशनचे धडे अत्यंत माफक दरात देणार आहेत.

पुणे विद्यापीठाचा डिग्री प्लस हा महत्वकांक्षी प्रकल्प 
“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा डिग्री प्लस हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या ‘डिग्री प्लस’च्या माध्यमातून विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्दीमत्ता, क्लाउड कॉम्पटिंग, उत्पादन क्षेत्र, अर्थशास्त्र, माध्यम, संस्कृती आदी क्षेत्रात त्यांची ज्ञानवृध्दी करता येईल. सध्या प्रायोगिक तत्वावर हे व्यासपीठ आम्ही सुरू केले आहे.”

– डॉ. नितीन करमळकर (कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading