Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल; तात्काळ जामीन मंजूर

मुंबई : येथील महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे   भाजप नेते आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जबाब नोंदवल्या नंतर शेलार यांना 1 लाखाचा ऑनटेबल जामीन तात्काळ मंजूरही करण्यात आला. इतकंच नाही तर शेलार यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत महापौरांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.

पेडणेकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे बुधवारी रात्री मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे आज सकाळपासूनच अनेक घडामोडींनी वेग घेतला. त्यावर शेलार यांना तात्काळ जामीन मिळवीला. अन् मुंबई उच्च न्यायालयामध्ये गुन्हा रद्द करण्यासाठी याचिकाही  दाखल केली आहे. यावेळी शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणाविरोधात उठणारा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्ही जेव्हडा आमचा  आवाज दाबायल भारतीय जनता पार्टी तो आवाज अजून उचलेल आणि तुमची कू कृत्य जनतेसमोर उघड करु’, असा इशारा शेलार यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला दिला.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading