fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

हे तर महाविकास आघाडीला सुरूंग लावण्यासारखे – चंद्रकांत पाटील    

पुणे : महाविकास आघाडी ही धर्म निरपेक्ष मुलतत्वावर आधारीत आहे. मात्र, नार्वेकर यांच बोलण आणि ट्विट करणं हे म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या पायाला सुरुंग लावण्या सारखे आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी बाबरी मशीदीवरील शिवसेनेच्या आंदोलनाची आठवण करून देणारा एक फोटो ट्विट केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील बोलत होते. आज भाजपची महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांची चिंतन बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप मधले काही पदाधिकारी व नगरसेवक नाराज आहेत. अशी चर्चा सुरू आहे, या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले,कुठंही नगरसेवक पदाधिकारी नाराज नाहीत, असे सांगितले.

शिवसेना डबल ढोलकी करत आहे 

दोन दिवसापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांची भेट झाली.  या भेटीमुळे राज्यात  शिवसेना यूपी मधल्या घटक पक्षा बरोबर निवडणुका लढणार अशी चर्चा राज्यात सुरू झाली. त्यावर शिवसेना डबल ढोलकी करत आहे. एकीकडे ममता बॅनर्जी यांना भेटतात अन तिकडे यूपीए बैठकीला जातात, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading