fbpx
Sunday, May 19, 2024
ENTERTAINMENTLatest News

इंडियन आयडल मराठीच्या ग्रँड प्रीमियर मध्ये पुण्याच्या स्पर्धकांनी मारली सुरांची बाजी

पुणे : सोनी मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अल्पावधीतच आपलंस केलं. पहिल्यांदाच इंडियन आयडल हा कार्यक्रम प्रादेशिक भाषेमध्ये होत असून तो पहिल्यांदाच मराठीमध्ये होत आहे . ‘अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या कार्यक्रमाची निर्मिती आराधना भोला यांच्या फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. या संस्थेने केली आहे. अजय-अतुल सारखे परीक्षक असल्याने कार्यक्रमाला अजूनच रंगत चढली आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके असलेल्या अजय-अतुल यांनी उत्तमोत्तम गायकांची निवड केली आहे. ऑडिशन राउंडला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धकांनी हजेरी लावली होती. कोणाची निवड करायची, हे ठरवणं परीक्षक अजय-अतुल आणि बेला शेंडे ह्यांच्यासाठी अवघड होतं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री स्वानंदी टिकेकर करत आहे .

थिएटर राउंडमध्ये उत्तम १२ स्पर्धकांची निवड होणार होती, पण उत्तम स्पर्धक ठरवणं अवघड असल्यानं अजून २ स्पर्धकांची निवड करून महाराष्ट्राच्या मातीतून आलेल्या उत्तम कलाकारांची टॉप १४ मध्ये निवड करण्यात आली . यात प्रामुख्याने पुण्यातील अश्विनी मिठे , चैतन्य देवढे , शुभम खंडाळकर, आणि अमोल सकट यांची निवड करण्यात आली .या सुरांच्या प्रवासाला लिखाणाचीही साथ लाभत आहे. लेखक वैभव जोशी या कार्यक्रमाचं लिखाण करत असून एक दर्जेदार कलाकृती रसिकांना बघायला मिळतेय, यात शंकाच नाही. या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी अजित परब देखील आहेत. कोणतं गाणं म्हणायचं, ते कसं गायचं ह्या सगळ्यात म्युझिशियनच्या मदतीने ते स्पर्धकांना मदत करत आहेत.

या शोबद्दल अजय अतुल म्हणाले की इंडियन आयडल सारखा हा देश विदेशात गाजलेला तसेच हिंदी भाषेतील लोकप्रिय शो मराठीसारख्या मोठ्या प्रादेशिक भाषेत आला आहे याचा आम्हाला आनंद होत आहे .या कार्यक्रमाची खूप क्रेझ असल्यामुळे हा शो नक्कीच गाजणार आहे . ७००० स्पर्धकांमधून टॉप १४ स्पर्धक निवडणे आमच्यासाठी खूप कठीण होते. त्यातूनही टॉप १२ च स्पर्धक निवडायचे होते परंतु आम्ही सोनी मराठी वहिनीला विनंती करून टॉप १४ स्पर्धक निवडले

पाहा इंडियन आयडल मराठी सोमवार आणि मंगळवार रात्री ९ वा. फक्त सोनी मराठीवर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading