Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

नाट्यगृह लवकर सुरु करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने स्मरण आंदोलन..

पुणे : वडगाव बुद्रुक येथे नाट्य व कलाप्रेमींसाठी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या नावाने उभारले जात असलेले नाट्यगृह कला मंदिर हा प्रकल्प अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. नाट्यगृह बांधकामाचा शुभारंभ जानेवारी २०१७ मध्ये करण्यात आला. मात्र, संथगतीने काम सुरू असल्याने साडेचार वर्षे होऊनही नाट्यगृहाचे काम अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. नाट्यगृहाचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करावे, यासाठी शिवसेनेतर्फे स्मरण आंदोलन करण्यात आले. शिवसेनेच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातर्फे हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे, शहराध्यक्ष गजानन थरकुडे, संजय मोरे, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, खडकवासला क्षेत्र समन्वयक मनिष जगदाळे, नितीन वाघ, संतोष गोपाळ, वैभव हनमघर, निलेश गिरमे, अमोल दांगट, अनंत घरत, दशरथ खिरिड, विनायक नलावडे, अनिकेत देशमुख, संतोष सावंत, किरण माईंगडे, रमेश देसाई, रामदास गायकवाड, प्रसाद काकडे, नितीन दरेकर, संजय पोळ, रेखा कोंडे, सुनिता खंडाळकर, संगीता नाईक, संजय साळवी, राहूल शिंदे, प्रथमेश भूपल उपस्थित होते.

सध्या नाट्यरसिकांना एखादे नाटक किंवा अन्य कार्यक्रम पाहायचा असल्यास जंगली महाराज रोडवरील बालगंधर्व किंवा कोथरूड येथील यशवंतराव नाट्यगृहात जावे लागते. या दोन्ही नाटयगृहांचे अंतर जास्त असल्यामुळे अनके नाट्यरसिकांना नाटक किंवा कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नाही. अनेक नाट्यसंस्थाना नवीन आलेले नाटक या भागात प्रदर्शित करावयाचे असते. परंतु, कोणतेही सभागृह किंवा नाट्यगृह नसल्यामुळे त्यांचीही गैरसोय होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता नाट्यगृहाचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी नाट्यरसिकांकडून होत आहे.

गजानन थरकुडे म्हणाले, “स्मरण आंदोलनाच्या” माध्यमातून आम्ही प्रशासनाला हे नाट्यगृह लवकरात लवकर सुरु करावे याची आठवण करुन देत आहोत. भविष्यात अजून विलंब झाला तर आहे ह्याच स्थितीत याठिकाणी विडंबनात्मक पथनाट्य, खुले नाटक सादर करण्यासाठी या जागेचा वापर शिवसेनेच्यावतीने करण्यात येईल.

संजय मोरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने विविध प्रकल्प सुरु करायचे आणि त्यांच्या नावाने मते मागून निवडून येण्यात महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या नगरसेवकांचा हातखंडा आहे. महाराजांचे नाव देऊन त्यामध्ये भ्रष्टाचार करायचा किंवा जाणून बुजून दिरंगाई करायची हे आता कदापी सहन केले जाणार नाही. नाट्यगृह लवकर सुरु केले नाही तर सेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading