Sunday, November 1, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कुणालाही चुकीची माहिती लिहिण्याचा अधिकार नाही – चंद्रकांत पाटील

पुणे:नाशिक येथे  सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आलेले ज्येष्ठ पत्रकार  गिरीष कुबेर यांना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आली . त्यावर सामान्य नागरिक व विविध पक्ष व संस्थांकडून निषेध होत आहे.

कुणालाही स्वातंत्र्यवीर सावरकर व संभाजी महाराज यांच्या बदल लिहण्याचे स्वातंत्र्य आहे .पण चुकीची माहिती लिहिण्याचा अधिकार नाही. अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, संभाजी ब्रिगेडने जी गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकली तीएकदम चुकीचे आहे. त्यांनी राग असा व्यक्त करायला पाहिजे नव्हता. असेही  चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply