BIG BREAKING – पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये 7 जणांना ओमिक्रॉनची लागण
पुणे : कालच मुंबईत ओमिक्रॉनचा (omicron) रुग्ण आढळून आल्यानंतर; आता पुण्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. आज पुणे आणि पिंपरी-चिचवड व आळंदी मध्ये ओमिक्रॉनचे नवे 7 रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता देशात 21 तर महाराष्ट्रात 8 ओमिक्रॉनचे रुग्ण झाले आहेत. यावरून राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहिती नुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात एका रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पिंपरी चिंचवडमधील 44 वर्षीय रुग्ण नायजेरियातून आपल्या भावाला भेटायला आली होती. टी महिला तिच्या दोन मुली, भाऊ आणि भावाच्या दोन मुली असे सहा ही जण कोरोना पॉझिटिव्हअसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर पुणे शहरात आढळून आलेला रुग्ण हा फीनलंड येथून आलेला असून त्याने कोरोना लसीचे दोन्ही ही डोस घेतले आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत.
