Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे: रंगा राचुरे

पुणे : राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेसच मोदी सरकारला (Modi Government) घालवू शकतो. केजरीवाल आणि महाराष्ट्रातील काही पक्ष राज्यांपुरते मर्यादित प्रादेशिक पक्ष आहेत. त्यामुळे सर्व प्रादेशिक पक्षांनी काँग्रेससोबत यायला हवे, असेही श्री.पृथ्वीराज चव्हाण यांनी आज म्हंटले आहे.
गेल्या काही वर्षात जिथे जिथे काँग्रेस भाजप लढत झाली तिथे काँग्रेस हरली किंवा काँग्रेसने सत्ता स्वतःच्या चुकांमुळे घालवली. गोवा चे उदाहरण घेता येईल. दुसरीकडे भाजप विरोधात प्रादेशिक अथवा छोटे पक्ष उभे राहिले तिथे जनतेने या पक्षांना बहुमत दिले, उदा दिल्ली ,पश्चिम बंगाल. यामुळे काँग्रेस आता ताकद व जनतेचा विश्वास गमावून बसलेला पक्ष झाला आहे. कॉंग्रेसनेच आता आत्मपरीक्षण करावयाची गरज आहे अशी परखड प्रतिक्रिया आम आदमी पार्टीचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी दिली आहे.

Leave a Reply