Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सांगवीत मोफत आरोग्य शिबीर संपन्न

पिंपरी  : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल नानासाहेब शितोळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पिं.चि.शहर उपाध्यक्ष उज्ज्वला सुनील ढोरे, सांगवी विकास मंचच्या अध्यक्षा नीलिमा महेश भागवत यांच्या संयुक्तपणे सांगवी येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड यांच्या तर्फे मोफत कर्करोग तपासणी, क्रिस्टल आय केअर यांच्या तर्फे मोतीबिंदू तपासणी करून निदान झालेल्या रुग्णांना डोळे तपासणी करून सर्व रुग्णांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. तसेच एम्स हॉस्पिटल, चाकण क्रिटिकल हॉस्पिटल, ज्ञानमोटे हॉस्पिटल, एन्सोकेअर रेडिओलॉजी अँड डायगनोस्टीक सेंटर, अन्वय क्लिनिक यांच्या तर्फे आयुर्वेदिक मोफत तपासणी व आयुर्वेदिक औषध वाटप करण्यात आले.

या आरोग्य शिबिराची सुरुवात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, नगरसेवक नाना काटे, प्रभाकर वाघेरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, सनी ओव्हाळ, बाळासाहेब पिल्लेवार, शाम जगताप, शिवाजी पाडुळे, महेश भागवत, ओंकार महेश भागवत, सुनील ढोरे, तसेच मंडळाचे कार्यकर्ते संतोष चव्हाण, बाळासाहेब नाईक, अधिराज शितोळे, भटू शिंदे, मयूर मधाळे, सुजित जाधव, दिनेश केदारी, मुख्य समन्वयक तेजस भगत, पश्चिम जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading