Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

घाबरू नका, काळजी घेऊयात : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान सेवा सुरू झाल्यापासून, पुण्यात विमानप्रवास करून येणाऱ्या प्रत्येकाची महापालिकेच्या वतीने RT-PCR टेस्ट केली जात होती. त्यातीलच फिनलँड येथून प्रवास करून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रोन व्हेरियंटची लागण असल्याचे समोर आले आहे. घाबरू नका, काळजी घेऊयात असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. 

लागण झालेल्या व्यक्तीची प्रकृती चांगली आहे. तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून त्या व्यक्तीच्या इमारतीमधील सर्वांची RT-PCR टेस्ट करण्यात आलेली आहे. पुणेकर नागरिकांनी, कोणत्याही अफवांना बळी पडून घाबरून जाण्याची गरज नाही. महापालिकेच्या वतीने सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क आणि सुसज्ज ठेवण्यात आलेली आहे. परदेशातून आलेल्या आणि पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी अजूनही कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही, त्यांनी ती त्वरित घेणे अत्यंत गरजेचे आहे. असे मोहोळ यांनी म्हटले आहे. 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading