Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRA

अपंगत्वावर मात केलेल्या महाराष्ट्रातील १० दिव्यांगांना राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली : अपंगत्वावर मात करून आपले स्वतंत्र अस्त‍ित्व निर्माण केलेल्या महाराष्ट्रातील 10 दिव्यांगाना वर्ष 2020 च्या राष्ट्रीय सक्षमीकरण या राष्ट्रीय पुरस्काराने आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद्र यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यासह दिव्यांगांच्या सुगम्यतेसाठी नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागालाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आज ‘आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसा’निमित्त केंद्रीय सामाजिक आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने  ‘राष्ट्रीय सक्षमीकरण पुरस्कार’ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रपती, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री विरेंद्र सिंह, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्रीव्दय रामदास आठवले, प्रतिमा भौमिक, सचिव अंजली भावड़ा, उपमहानिदेशक किशोर सुरवाडे उपस्थित होते.

यावेळी एकूण 59 व्यक्तींना तसेच शासकीय अशासकीय संस्थांना विविध श्रेणीतील पुरस्काराने गौरिविण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 10 व्यक्ती तसेच नाशिक सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा समावेश आहे. मूळची महाराष्ट्राची सध्या दिल्लीत वास्तव्यास असलेली देवांशी जोशी यांनाही आज राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रातून राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये चलन अक्षमता (महिला) श्रेणीमध्ये उत्कृष्ट कर्मचारी (स्वरोजगार) या श्रेणीमध्ये सांगलीच्या डॉ. पुनम उपाध्याय यांना पुरस्कृत करण्यात आले. चलन अक्षमता (पुरूष) श्रेणीमध्ये कोल्हापूराच्या देवदत्त रावसाहेब माने यांना रोल मॉडेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चलन अक्षमता (महिला) या श्रेणीतील रोल मॉडेल चा पुरस्कार लातूरच्या  डॉ. प्रीति पोहेकर यांना प्रदान करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट दृष्टिबाधित कर्मचारी (महिला) या श्रेणीतील पुरस्कारासाठी मुंबईच्या निकिता वसंत राऊत यांना आज राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिव्यांगांसाठी कार्यकरणा-या वैयत्किक श्रेणीमध्ये पुण्याच्या सकीना संदीप बेदी यांना सर्वोत्कृष्ट व्यक्तीचा पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. दृष्ट‍िबाधित (महिला)  श्रेणीतील रोल मॉडेल चा राष्ट्रीय पुरस्कार बांद्रा (ईस्ट) ,मुंबई  येथे राहणाऱ्या  नेहा नलिन पावस्कर यांना प्रदान करण्यात आलेला आहे.

दृष्टीबाधित (पुरूष) श्रेणीतील रोल मॉडेल चा राष्ट्रीय पुरस्कार नागपूरचे राजेश असुदानी यांना मिळालेला आहे. श्रवणबाधित (पुरूष) श्रेणीतील रोल मॉडेल चा राष्ट्रीय पुरस्कार औरंगाबादच्या  सागर राजीव बडवे यांना प्रदान करण्यात आला आहे. बौध्दिक दिव्यांगता (पुरूष) श्रेणीतील रोल मॉडेल चा राष्ट्रीय पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमधील प्रथमेश यशवंत दाते यांना प्रदान करण्यात आला आहे.  बौध्दिक दिव्यांगता  (महिला)  श्रेणीतील रोल मॉडेल चा राष्ट्रीय पुरस्कार मुळची महाराष्ट्रातील सध्या दिल्लीत वास्तव्यास असणारी देवांशी जोशी यांना प्रदान करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट दिव्यांग क्रीडा खेळाडू (महिला) या श्रेणीमध्ये वैष्णवी विनायक सुतार यांना सन्मानित करण्यात आले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading