पुण्याचं पाणी कमी करण्याचा प्रयत्न कुणी करू नये,जो असे करेल त्याला पुणेकर पाणी पाजल्या शिवाय राहणार नाही – देवेंद्र फडणवीस
पुणे:पुणेकराचे पाणी कपात करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला आहे त्यावरून महापौर व राज्य सरकारमध्ये वाद निर्माण झाला आहे त्यावर पुण्याचं पाणी कमी करण्याचा प्रयत्न कुणी करू नये,जो असे करेल त्याला पुणेकर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते व भाजपचे नेते देवेंद्र फडणविस यांनी पुण्यात भाजप कार्यालय चे उद्घाटनावेळी आले असता पत्रकार परिषद घेऊन दिला.
या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह भाजप पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपचे हे कार्यालय आज नवीन ठिकाणी झाले हे भाजपचे कार्यालय लोकाभिमुख आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
