Thursday, June 18, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

भारतात ‘ओमिक्रॉन’चा शिरकाव

नवी दिल्ली : भारतात ‘ओमिक्रॉन’चा (Omicron) शिरकाव झाला आहे. कर्नाटकातील दोन कोरोना बाधित रुग्णांमध्ये ‘ओमिक्रॉन’ हा डिटेक्ट झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज दिली आहे. त्यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली आहे.

दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या दोन रुग्णांना ‘ओमिक्रॉन’ची लागण झालयांचे आढळून आले आहेत. ज्यात 66 आणि 46 वयोगटातील दोन पुरुष रुग्णांचा समावेश आहे. या दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचा शोध घेण्यात आला असून त्यांची चाचणी केली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, ‘ओमिक्रॉन’ हा कोरोनाच्या पूर्वीच्या प्रकारांपेक्षा अधिक प्राणघातक आहे की नाही हे शोधण्यावर संशोधक अजूनही काम करत आहेत. तसेच सध्याच्या लसींद्वारे त्याचा प्रतिकार केला जाऊ शकतो का, नाही ? याबद्दलही शंका आहे. या पार्श्वभूमीवर ‘ओमिक्रॉन’चा भारतात झालेला शिरकाव हा अधिक चिंतेचा विषय बनला आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading