Thursday, June 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘बुतशिकन जावळी’ चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित

छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या प्रसंगानंतर घडणाऱ्या घटनांचा काल्पनिक विस्तार करणाऱ्या ‘बुतशिकन जावळी’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऐतिहासिक प्रसंगावर आधारित काल्पनिक चित्रपट, अशी टॅग लाईन असलेले या चित्रपाते मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे.

या चित्रपटाचे लेखक – दिग्दर्शक अभिमन्यू डांगे आहेत . या पूर्वी अभिमन्यू डांगे यांना ‘कातळ’ या लघुपटाच्या छायांकनासाठी त्यांना ‘दादासाहेब फाळके राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. त्यांनी गॉनकेश (२०१९), हॅंडओवर (२०११) या चित्रपटांचे छायांकन देखील केले आहे. तसेच त्यांनी छायांकन केलेल्या ‘मी वसंतराव’ ह्या चित्रपटाची IIFI २०२१ या प्रख्यात चित्रपट महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. FTII या संस्थेतून छायांकनाचे प्रशिक्षण घेतले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading