पुण्यातून पर्यटनाला वाढती मागणी; महिन्याला ७०% वाढ; थॉमस कुकचे कंट्री हेड राजीव काळे यांची माहिती

पुणे : “कोरोनानंतर कौटुंबिक सहली, मित्रांचे ग्रुप, हनिमून ट्रॅव्हल यामुळे पुण्यातून पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही वाढ महिन्याला ७० टक्के इतकी असून, स्थानिक पर्यटनात ३०० टक्क्यांनी, तर परदेशी प्रवासात ५० टक्क्यांनी वाढ झाल्याचे निरीक्षण सप्टेंबर अखेरपर्यंत नोंदवण्यात आले आहे. शिवाय, उत्सवाच्या आणि हिवाळ्याच्या हंगामामुळे कोरोनानंतर ५५ टक्के पर्यटन पूर्वपदावर येत आहे,” अशी माहिती थॉमस कुक इंडियाचे कंट्री हेड आणि हॉलिडेज, माइस, व्हिसा विभागांचे प्रमुख राजीव काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी वेस्ट इंडिया सेल्स हेड मीनल हाते, रेस्ट ऑफ महाराष्ट्र सेल्स हेड श्रेयस खापरे, क्वालिटी कंट्रोल मॅनेजर मनीष कबरे, युरोप टूर मॅनेजर मिलिंद गायकवाड, इम्रान चौहान आदी उपस्थित होते.

राजीव काळे म्हणाले की, ” लॉकडाऊनमुळे आलेला थकवा आणि प्रचंड वाढलेल्या मागणीमुळे पुणेकरांमध्ये पर्यटनाची प्रचंड इच्छा दिसतेय. जून २०२१ मध्ये निर्बंध शिथिल झाल्यापासून दर महिन्याला पर्यटनामध्ये ७०% वाढ होताना दिसत आहे. आगामी उत्सवांचा हंगाम व हिवाळा, एक्स्पो दुबई २०२० आणि हनिमूनसाठी होणारे पर्यटन हे घटक पुण्यातील पर्यटन वाढीसाठी कारणीभूत ठरले आहेत. थॉमस कुक इंडियाच्या अहवालानुसार कोविडपूर्व पर्यटन प्रमाणाच्या सध्या ५५% मागणी आहे. यात स्थानिक पर्यटनाच्या मागणीत ३००% वाढ झाली आहे तर परदेशी पर्यटनामध्ये ५०% वाढ झाली आहे. मालदिव्ह्ज, स्वित्झर्लंड, फ्रान्स, रशिया, तुर्की आणि इजिप्त या देशांमधील पर्यटनाला जास्त मागणी आहे आणि एक्स्पो २०२० दुबईलाही सध्या वाढती मागणी दिसून येत आहे. त्याचप्रमाणे शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्यांची संख्या पुण्यातून वाढताना दिसत आहे आणि क्वारंटाइन पॅकेजेससह थॉमस कुक इंडियाने अमेरिका व कॅनडाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी उत्तम प्रकारे सेवा दिली आहे.”

“थॉमस कुक इंडियाचे महाराष्ट्रात मुंबई व पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि अहमदनगर या महत्त्वाच्या टिअर २-३ शहरांमध्ये एकूण २५ आउटलेट्स आहेत. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७७% व्यक्तींना २०२१ या वर्षातच पर्यटन करण्याची इच्छा आहे. यामध्ये ६२% व्यक्तींनी परदेशी ठिकाणांना पसंत केले आहे;, तर ७८% व्यक्तींनी स्थानिक पर्यटनाला प्राधान्य दिले आहे; काश्मीर, लेह-लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड; तसेच ईशान्य भारत, राजस्थान आणि अंदमानसाठी वाढती मागणी दिसून येत आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

पुणेकरांना लडाख, काश्मीर, राजस्थान, दक्षिण भारतात बाइकिंग सारख्या आउटडोअर ऍडव्हेंचर सहली आवडतात. डोंगराळ प्रदेशातील ठिकाणे आणि एटीव्ही राइड्स व ऍपल ऑर्चर्डमध्ये पिकनिक लंच; अंदमान व समुद्रकिनाऱ्यावारील ठिकाणे व तेथील सी-कार्टिंग, स्नॉर्केलिंग इ. ऍक्टिव्हिज आवडतात. स्वित्झर्लंड व फ्रान्समध्ये ख्रिसमस मार्केटच्या उत्सवांसह हिवाळी पर्यटन किंवा रशियातील लॅपलँड व नॉर्दर्न लाइट्स, नाइल क्रुझ, कप्पाडोसियामध्ये (तुर्की) हॉट एअर बलुनिंग आणि एक्स्पो दुबई २०२० ही आघाडीची लोकप्रिय ठिकाणे आहेत.

 

Leave a Reply

%d bloggers like this: