पुण्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांशी गांधी भवन मध्ये गुरुवारी संवाद

पुणे : अफगाणिस्तानच्या अस्वस्थ परिस्थितीमुळे तेथील सर्वसामान्य माणसाचे आणि पुण्यात शिकणा-या अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून गेले आहे. या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाने संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे. हा संवाद कार्यक्रम गुरुवारी,१६ सप्टेबर दुपारी २ वाजता गांधी भवन (कोथरूड) येथे होणार आहे .या कार्यक्रमाचे संयोजक आणि युवक क्रांती दलाचे राज्य संघटक जांबुवंत मनोहर यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युक्रांदचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी ,ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले,राज्य कार्यवाह संदीप बर्वे ,शहराध्यक्ष सचिन पांडुळे, रोहन गायकवाड इत्यादी उपस्थित राहणार आहेत .

Leave a Reply

%d bloggers like this: