ऑक्सिजन जनरेटर उत्पादनासाठी गोदरेज अँड बॉयसची डीआरडीओ बरोबर भागीदारी

मुंबई : गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असणाऱ्या गोदरेज अँड बॉयसने असे जाहीर केले आहे की गोदरेज प्रिसिजन इंजिनीअरिंग या त्यांच्या व्यवसाय शाखेला डीआरडीओच्या बंगळूरू येथील डिफेन्स बायो इंजिनिअरींग अँड इलेक्ट्रोमेकॅनिकल लॅबोरेटरी (DEBEL) तर्फे भारत सरकारच्या ऑक्सिजन बफर प्लॅनला पाठबळ म्हणून ऑक्सिजन जनरेटर उत्पादनाची ऑर्डर मिळाली आहे. डीआरडीओने सध्याच्या तंत्रज्ञान भागीदार यांच्याकडून १० खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना हे तंत्रज्ञान हस्तांतरित केले आहे. त्यात गोदरेज अँड बॉयसचा समावेश आहे.

 नवनवीन व्हेरीएंट उद्भवत असल्यामुळे महामारीचे संकट अजूनही मोठे आहे आणि वैद्यकीय ऑक्सिजनची गरज वाढतच आहे. भारत सरकारने अलिकडेच माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार राज्य आणि प्रादेशिक पातळीवर रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बफर्स तयार असतील याची खातरजमा करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जात आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठीडीआरडीओची प्रयोगशाळा DEBEL ने ऑक्सिजन जनरेटरच्या उत्पादनासाठी गोदरेज अँड बॉयसच्या गोदरेज प्रिसिजन इंजिनीअरिंग या व्यवसायशाखेची निवडक भागीदार म्हणून निवड केली.

पहिल्या संचाचे उत्पादन पूर्ण झाले असून उत्तर प्रदेशउत्तराखंड आणि मध्यप्रदेश या राज्यांतील ग्रामीण रुग्णालयांमध्ये एक महिन्याच्या विक्रमी वेळेत पुरवठा झाला आहे.

ऑक्सिजन प्लांटला दाब दिलेली हवा पुरविण्यासाठी ही यंत्रणा एअर कॉम्प्रेसरचा वापर करते. ही हवा गाळली जाते आणि नंतर रेफ्रीजरंट एअर ड्रायरने वळवली जाते आणि त्यानंतर पुन्हा अॅडसोर्प्शन टॉवरमधून ऑक्सिजन जनरेटर पर्यंत जाण्याआधी पुन्हा एकदा गाळली जाते. ऑक्सिजन जनरेटर रेणुकीय चाळणीतून अॅडसोर्प करून हवेतील नायट्रोजन काढून टाकतो आणि ९३+३ टक्के ऑक्सिजन निर्मिती होते. हवेतून ऑक्सिजन वेगळा काढण्यासाठी वैद्यकीय ऑक्सिजन जनरेटर प्रेशर स्विंग अॅडसोर्प्शन (पीएसए) तंत्रज्ञानाचा अवलंब करतात. आउटपुट स्टोरेज टँक (साठवणुकीच्या टाक्यांमध्ये)मध्ये साठवून ठेवले जाते. प्रत्येक जनरेटर दर मिनिटाला २५० लिटर ऑक्सिजन निर्माण करू शकतो जो ५० रुग्णांची गरज भागवू शकतो.

या भागीदारीबद्दल बोलताना गोदरेज अँड बॉयसच्या कार्यकारी संचालक नायरिका होळकर म्हणाल्या, “आपल्या संपूर्ण इतिहासात गोदरेज अँड बॉयसने दशकानुदशके सर्वोत्तम अभियांत्रिकी कौशल्याचा वापर करून भारताच्या स्वदेशी चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे. या नवीन वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती व्यवस्थेद्वारे कोव्हीड विरुद्ध लढ्यात भारताला सहकार्य करण्याची आम्हांला आशा आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: