ओबीसी राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक

पुणे: ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार दोघे एकमेकावर एम्पिरिकल डेटा हा तुम्ही द्यायचा आहे म्हणून एकमेकांवर आरोप करत आहेत. ह्या दोघांमुळे ओबीसी अरक्षणाशिवाय जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. ओबीसी समाजाचा  विश्वास घात केला म्हणून ओबीसी आरक्षण घालविण्याया सरकारच्या निषेधार्थ भाजपने आज पुण्यात धरणे आंदोलन केले.
पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आलेलं आंदोलन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. ओबीसींना अजूनही राज्य सरकारने आरक्षण दिले नाही म्हणून आघाडी सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला.
या आंदोलनाला आमदार गोपीचंद पडळकर, पुणे शहर ओबीसी आघाडी अध्यक्ष योगेश पिंगळे, प्रसाद सायकर, गणेश कळमकर, शंतनू पिंगळे, भाजपचे कार्यकर्ते व ओबीसींचे आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार गोपीचंद पडळकर,म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व नाकर्तेपनामुळेच ओबीसींना आरक्षण भेटत नाही . सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केले तेव्हा राज्य सरकारने परत अपिल करायला पाहिजे होती. पण या महा विकास आघाडी मधल्या मंत्रांमुळे आज ही आपल्या ओबीसी समाजावर वेळ आलेली आहे. या सरकारला काही ओबीसींचे घेणेदेणे नाही. या सरकारने लवकरात लवकर ओबीसी समाजाला आरक्षण लवकरात लवकर देण्याची सुबुद्धी व्हावे म्हणून आम्ही राज्यभर आंदोलन करत आहोत.

योगेश टिळेकर म्हणाले,राज्य सरकारने ओबीसी व मराठी समाजाचे आरक्षण रघडवले आहे. एम्पिरिकल डेटा हा राज्य सरकार ने मान्य करून ओबीसी ना आरक्षण दिले पाहिजे.पण राज्य सरकार हे आरक्षण देत नाही. आगामी निवडणुकीच्या आधी ओबीसी ना राजकीय आरक्षण सरकार ने दिले पाहिजे.पण ते काही देणार नाही असे दिसते.म्हणून आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत.

Leave a Reply

%d bloggers like this: