गजानन पंडित, मदिना तांबोळी, इक्बाल दरबार यांना ‘बंधुभाव गणेशोत्सव’ पुरस्कार 

पुणे : गजानन पंडित, मदिना तांबोळी, इक्बाल दरबार यांना बंधुभाव गणेशोत्सव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अखिल मंडई मंडळ, उम्मत सामाजिक संस्था आणि बंधुभाव भाईचारा फाउंडेशन यांच्यावतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. १६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता अखिल मंडई मंडळाच्या समाजमंदिरात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, शिक्षणतज्ज्ञ  पी. ए. इनामदार, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.
हिंदू मुस्लीम एकता जोपासत वर्षांनुवर्षे गणरायाची सेवा करणार्या गणेशभक्त कार्यकर्त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.  गजानन पंडित, मदिना तांबोळी, इक्बाल दरबार, निलेश नवलखा, निलेश राऊत, डॉ. मुश्ताक मुकादम, महंमदभाई बागवान, बहाबभाई शेख, अब्दुल करीम अल्तार, असगरभाई गोध्रावाला, आत्मचरण शिंदे यांना या पुरस्कारांने सन्मानित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: