Monday, June 22, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

धक्कादायक – 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या

पुणे : येरवडा भागात राहणाऱ्या शाळकरी मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री  घडली. रिचा दिलीप देवकर (वय 14, रा. चित्रा चौकाजवळ येरवडा) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. रिचाने नेमकी आत्महत्या का केली ? याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कंजारभाट वसाहती समोर चित्रा चौकात एका घराच्या पहिल्या मजल्यावर एका लहान मुलीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली असता रिचा हिने पहिल्या मजल्यावरील खोलीत छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. उपचारासाठी ससून रुग्णालयात नेले असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रिचाच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. दोन दिवसापूर्वी तिचे आईवडील त्यांच्या गावी गेले होते. भाऊ व ती दोघेच घरी होते. भाऊ घरा बाहेर गेल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले. अचानक घडलेल्या घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. रिचाने आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईक व परिसरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. तिने अचानक आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading