तृतीयपंथी व असंघटित कामगारांसाठी विशेष लसीकरण मोहीम


पुणे : विद्यानगर येथील चलवादी शिक्षण संस्थाच्या वतीने पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यू कॉलेज मध्ये तृतीयपंथीयांना व असंघटित कामगारांना विना ओळखपत्र मोफत कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील सर्वाधिक वंचित व दुर्लक्षित घटकांना ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नाही त्या लोकांना अनेक शासकीय लाभापासून वंचित राहावे लागते आश्या तृतीयपंथी व असंघटित कामगारांसाठी या विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते आसे आयोजिका व चलवादी शिक्षण संस्थेच्या सचीव रेणुका चलवादी यांनी म्हटले .यावेळी वडगाव शेरी मतदार संघाचे अध्यक्ष नानासाहेब नलावडे ,माजी नगरसेवक हुलगेश चलवादी ,पुणे शहर राष्ट्रवादी युवती अध्यक्षा आश्विनी परेरा ,पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाचे अधिकारी रामदास चव्हाण , वडगाव शेरी युवक अध्यक्ष किरण खैरे उपाध्यक्ष,सुहास तळेकर,सिद्धार्थ अष्टेकर ,ललित लांडे,उषा सूर्यवंशी ,डॉ संध्या तम्मवार , क्रांतीनाना मळेगावकर, लक्ष्मी पाटोळे ,के. टी .सूर्यवंशी , लखन ओव्हाळ ,लक्ष्मी कांबळे ,संजय टाकळकर ,साजन ओव्हाळ ,कीर्ती टाकळकर ,निरामय संस्थाचे वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: