आपे फेस्टिव्‍ह बोनान्‍झाच्या साथीने पियाजिओ करत आहे सणासुदींचे स्वागत

पुणे :इटालियन पियाजिओ ग्रुपची उपकंपनी छोट्या व्यावसायिक वाहनांच्या भारतातील अग्रगण्य उत्पादकांपैकी एक असलेल्या पियाजिओ आणि व्हेइकल्स प्रा. लि. (पीव्‍हीपीएल) ने आपे फेस्टिव्‍ह बोनान्‍झा ऑफरची घोषणा करून सणासुदींच्या उत्साहामध्ये अधिकच भर टाकली आहे. या योजनेअंतर्गत पियाजिओच्या भारतभरातील सर्व व्यावसायिक संपर्ककेंद्रांवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू आणि सवलत योजनांचा लाभ घेता येणार आहे.

१० सप्टेंबर आणि १५ नोव्हेंबरच्या दरम्यान केलेल्या कोणत्याही खरेदीवर एक सोन्याचे नाणे हमखास भेटवस्तू म्हणून दिले जाणार आहे व त्याचबरोबर डीलरशिप केंद्रांवर घेतल्या जाणा-या लकी ड्रॉमध्ये सहभागी झाल्यास १० ग्रॅम* सोन्याची नाणी किंवा २५,००० रुपयांपर्यंतची गृहोपयोगी उपकरणे अशा वस्तूंपैकी एखादे बंपर इनाम जिंकण्याची संधीही मिळणार आहे. या योजनेमध्ये पियाजिओच्या सर्व सीव्ही डीलरशिप्समध्ये मिळून एकूण ३० कोटी रुपयांपर्यंत* किंमतीची बक्षिसे वितरीत केली जाणार आहेत.

ही ऑफर पियाजिओच्या ४०० हून अधिक डीलरशिप्समध्ये उपलब्ध असणार आहे व कंपनीच्या इंटर्नल कम्बशन इंजिन वर्गातील पियाजिओ तीनचाकी वाहनाच्या खरेदीला या बक्षिसयोजना लागू असणार आहेत.

याप्रसंगी बोलताना कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर  दिएगो ग्राफी म्हणाले, भारतामध्ये ३० लाख आनंदी ग्राहक मिळविण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याचा पियाजिओला प्रचंड अभिमान आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगाला लवकरच येत असलेल्या सणासुदीच्या मोसमाचीही साथ लाभल्याने आम्ही आमच्या सर्व डीलरशिप्समध्ये ग्राहकांना भरपूर आकर्षक योजना आणि भेटवस्तूंचा लाभ घेण्याची संधी देणा-या आपे फेस्टिव्‍ह बनोन्‍झाचे आयोजन केले आहे, जी या श्रेणीमधील सर्वात भव्य ग्राहकयोजना आहे. उत्सवांच्या येत्या मोसमासाठी आमच्याकडून आमच्या ग्राहकांना आरोग्य आणि आनंदाच्या अनेक स्नेहमय शुभेच्छा.  

पीव्‍हीपीएलच्या सीव्‍ही बिझनेस विभागाचे ईव्हीपी आणि बिझनेस हेड साजू इ. एस नायर म्हणाले, सध्या आपण पॅनडेमिकमधून जात आहोत, तरीही येऊ घातलेल्या सणासुदीच्या मोसमासाठी आम्ही अत्यंत उत्साही आहोत व या उत्सवासाठी सीएनजी, डिझेल आणि पेट्रोल व एलपीजी अशा सर्व इंधन श्रेणींमधील उत्पादनांचे उत्तम पर्याय आम्ही ग्राहकांसाठी सज्ज ठेवले आहेत. आमच्या सर्व डीलरशिप्सनी या सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे आणि गणेश चतुर्थीपासून सुरू होऊन दिवाळीपर्यंत सुरू राहणा-या व यादरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये साजरा होणा-या सर्व प्रमुख सणांना सामावून घेणा-या या उत्सव योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना खास निमंत्रित केले जाणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: