Sunday, June 21, 2026
ENTERTAINMENTLatest News

प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ येणार आता चार दिवस

अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारी आणि सगळ्या प्रेक्षकांच्या टेन्शनवरची मात्र ठरलेली महाराष्ट्राची हास्यजत्रा ,आता पुन्हा चार दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . २० सप्टेंबर पासून आता हसण्याचे वार होणार आहेत चार आणि सगळ्यांची लाडकी महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार असे चार दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . यानिमित्ताने एक धमाल रॅप सॉंग रोहित राऊत यांनी गेले असून आता चार वार हास्यजत्रेचे चौकार असे म्हणत सगळे कलाकार बिंधास्त डान्स करताना दिसत आहेत.

प्रेक्षकांना देखील हे गाणं आवडला असून लाडकी हास्यजत्रा चार दिवस येणार असल्याचा आनंद त्यांना झालेला दिसत आहे . समीर – विशाखा , प्रसाद – नम्रता , गौरव – वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यविरांनी  मिळून प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी खळखळून हसविले आहे . प्रसाद- नम्रता यांची जोडी नेहमीच सरस ठरते , गौरव आणि ओंकार यांची विनोद प्रेक्षकांना पोटभरून हसायला भाग पडतात . हास्यजत्रा पाहून आनंद आणि मनोरंजन मिळाल्याचा प्रत्येक प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून  मिळाल्या .

रविवारची हास्यजत्रा झाल्यावर प्रेक्षकांनी चार दिवस हास्यजत्रेची मागणी केली होती . प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आता विनोदवीर आठवड्यातून चार दिवस यायला सज्ज झाले आहेत आता सगळ्यांची लाडकी हास्यजत्रा २० सप्टेंबर पासून आठवड्याचे चार दिवस प्रेक्षकांना भेटायला येणार आहे .

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading