हसन मुश्रीफ कुटूंबीयांचा 127 कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्या यांचा आरोप

मुंबई : महाआघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपा नेते  किरिट सोमय्या यांनी केला आहे. हसन मुश्रीफ कुटूंबीयांने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. त्याचे पुरावे मी आयकर विभागाला सादर केले आहेत.  ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनची नावं मी जाहीर केली होती, त्यात आता राखीव खेळाडू म्हणून हसन मुश्रीफ यांचेही नाव वाढवले असे ते म्हणाले. मुश्रीफांनी शेकडो कोटींचा घोटाळा, बोगस कंपन्या, त्यांच्या नावे मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप किरिट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. या संदर्भात त्यांनी २७ पानांचा पुरावा आपल्याकडे असल्याचा दावाही किरिट सोमय्या यांनी केला आहे.

बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी २ कोटीचे कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल\बोगस कंपनी आहे. नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, २ कोटीहून जास्त रक्कम दाखवली असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

पुढे सोमय्यांनी असेही म्हटले की, बाप बेटे दोघांच्या १२७ कोटींचे पुरावे आमच्याकडे आहेत. हसन मुश्रीफ यांनी पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या अकाऊंटमध्ये सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याचे ३ लाख रुपयांचे शेअर्स दाखवले आहे. २०१८-१९ मध्ये इन्कम टॅक्सने मुश्रीफांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. यावेळी बेनामी १२७ कोटींचे व्यवहार समोर आले आहेत. उद्या मी मुंबई इडीकडे अधिकृत तक्रार करणार आहे. २७०० पानांचे पुरावे देणार आहे. माझ्याकडे दोन मंत्र्यांच्या फाइल तयार होत्या. एक राष्ट्रवादी एक शिवसेनेच्या. आता राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा घोटाळा उघडकीस आणला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांचे घोटाळे लवकरच बाहेर काढू असे किरीट सोमय्या म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: