fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

बारामती लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास परवानगी मिळावी सुप्रिया सुळे यांची उर्जामंत्र्यांकडे मागणी

पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील काही गावांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प सुरू करण्यास लवकरात लवकर मंजुरी मिळावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली.

उर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन सुळे यांनी या मुख्य विषयासह बारामती लोकसभा मतदार संघातील विजेशी संबंधित अन्य विषयांवर चर्चा केली. पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य प्रवीण शिंदे यावेळी उपस्थित होते. राऊत यांना लेखी निवेदनही देण्यात आले असून त्यांनी याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदार संघात पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे, दिवे, कोथळे, पिंपरे आणि माहूर, दौंड तालुक्यातील हिंगणी बेर्डी, राहू तसेच बारामती तालुक्यातील मुरूम, देऊळगाव रसाळ, वाकी, गदरवाडी, वाढाणे, पणदरे, जळगाव सुपे, मोढवे, वडगाव निंबाळकर, खालकर वाडी, या गावांत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत महावितरणच्या बारामती मंडळाने ऊर्जा मंत्रालयालाकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठवला आहे. त्याची आठवण करून देत त्या प्रस्तावांना मंजुरी मिळावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी राऊत यांच्याकडे यावेळी केली.

याबरोबरच वेल्हे तालुका ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट साठी ६३ के.व्ही.च्या ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून द्यावा, भाटघर येथील सबस्टेशन तीन वर्षांपूर्वी पाण्यात बुडाले होते. त्याची दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यात यावे, मुळशी तालुक्यातील भूगाव येथे १३२ के.व्ही. सबस्टेशन मंजूर झाले आहे, त्याचे काम तातडीने सुरु करण्यात यावे आदी मागण्याही सुप्रिया सुळे यांनी राऊत यांच्याकडे केल्या आहेत.
वीज वितारणसंदर्भात भोर तालुक्याचा काही भाग पुणे ग्रामीण मंडळ, तर काही भाग बारामती ग्रामीण मंडळाला जोडला आहे. परिणामी वीज ग्राहकांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते. ग्राहकांचा हा त्रास कमी करण्यासाठी संपूर्ण भोर तालुक्याचा समावेश पुणे ग्रामीण मंडळाला जोडावा, अशी मागणी त्यांनी केली.

मतदार संघात नव्या सबस्टेशनची मागणी
बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण चौदा ठिकाणी नवीन सबस्टेशन उभे करण्याची यावेळी मागणी करण्यात आली. ती अशी –
निरगुडे तालुका इंदापूर 33×11 केव्ही.
राजेगाव तालुका दौंड 33×11 केव्ही.
रोटी तालुका दौंड 33×11 केव्ही.
वारजे तालुका हवेली 22×11 केव्ही.
वडकी तालुका हवेली 33×22 केव्ही.
बेलसर तालुका पुरंदर 33×11 केव्ही.
वीर तालुका पुरंदर 33×11 केव्ही.
पासली तालुका वेल्हे 33×11 केव्ही.
मार्गासनी तालुका वेल्हे 33×11 केव्ही.
कमथडी(मोहरी) तालुका भोर 33×11 केव्ही.
वेळू तालुका भोर 33×22 केव्ही.
भोर तालुका भोर 33×22 केव्ही.
कुंभेरी तालुका मुळशी 33×22 केव्ही.
मुठा तालुका मुळशी 33×11 केव्ही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading