महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह सहाजण दोषमुक्त
मुंबई : महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सहाजणांची मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी आपल्याविरोधात लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून ते रद्द करण्याची मागणी भुजबळांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. आज मुंबई सत्र न्यायालयाने याबाबत निर्णय दिला. या प्रकरणात आरोपींविरोधात कुठलेही सबळ पुरावे एसीबीकडे उपलब्ध नाहीत, असं कोर्टानं आज निर्णय देताना म्हटलं आहे. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणातून छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख, गीता जोशी, संजय जोशी या सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांच्या काळात विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाल्याचा आरोप होता. दिल्ली उभारलेल्या महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून साडे तेरा कोटींची लाच घेतल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आरोपपत्रात करण्यात आला होता.दरम्यान या निर्णयानंतर छगन भुजबळ, पुतण्या समीर आणि मुलगा पंकज भुजबळ यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
निकाला नंतर आयोजिय पत्रकार पारीषदेत भुजबळ म्हणाले की, EDची केस या प्रकरणावरुन बांधली गेली आहे. काही लोकांनी त्रासच द्यायचं ठरवलं होतं. आम्ही त्याचवेळी म्हटलं होतं, की सत्य परेशान होता है, पराजित नहीं. आम्ही विनम्रपणे हा निकाल स्वीकार करत आहोत. आमची कुणावरही तक्रार नाही. नियती कधी कधी दिवस आणते, ते भोगावे लागतात. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत त्यामुळं या कटकारस्थानातून आम्ही मुक्त होत आहोत, असं ते म्हणाले. माझ्यावर पक्षानं, शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असंही भुजबळ म्हणाले. या प्रकरणात आरोपींविरोधात कुठलेही सबळ पुरावे एसीबीकडे उपलब्ध नाहीत, असं कोर्टानं आज निर्णय देताना म्हटलं आहे. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणातून छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख, गीता जोशी, संजय जोशी या सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी या निर्णयानंतर हायकोर्टात धाव घेणार असल्याचे म्हटले आहे. छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना सेशन कोर्टाकडून महाराष्ट्र सदन केसमधून मुक्तता केली आहे. मी या निर्णयाला हायकोर्टात चॅलेंज करणार आहे, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.
