उत्सवादरम्यान महिला दक्षता समितीने करावयाच्या कामासाठी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केल्या सुचना

पुणे : येणाऱ्या गणेशोत्सव व नवरात्र उत्सवात गर्दीच्या ठीकाणी महिलांना छेडछाड, लुटमार, गरोदर मातेला सुविधा, अचानक होणारे शॉर्ट सर्किट सारख्या गोष्टी थांबवण्यासाठी व नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत म्हणून महिला दक्षता समिती व स्त्री आधार केंद्राचे स्वयंसेवक जागोजागी सहाय्यता देतात. या सर्व कामाच्या सुव्यवस्थित नियोजनासाठी येत्या काळात महिला दक्षता समितीने कार्यपुस्तिका प्रकाशित करण्याचा सल्ला समितीला निलम गोर्हे यांनी दिला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरोपींना पकडणे सोपे झाले असले तरी त्या कामासाठी खुप कालावधी लागतो हे ही सत्य आहे. जागोजागी लावलेल्या सीसीटीव्ही च्या मदतीने घडत असलेला गुन्हा जर तत्काल थांबवता आला तर पिडीतांना न्याय व त्याच्यावर होत असलेला अत्याचार तत्काल कसा थांबवू शकतो यावर पोलीस विभागाने विचार करावा तसेच सायबर गुन्हे, मानवनिर्मित दुष्कर्म, नैसर्गिक आपत्ती तथा गुंडगिरी प्रवृत्ती निवारण करण्यासाठी ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी काही सुचना केल्या.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या सर्व पोलीस ठाण्यातील महिला दक्षता समित्यांच्या कार्यासंदर्भात ऑनलाईन बैठक आज झाली. आजच्या बैठकीत मुख्यतः महिला दक्षता समिती व स्त्री आधार केंद्र करत असलेल्या कामाचा आढावा देण्यात आला. तसेच येणारे गणेशोत्सव व नवरात्र उत्सवात महिला दक्षता समिती कशा पद्धतीने काम करतील यासंदर्भात मार्गदर्शन, खुली चर्चा व सुचना करण्यात आल्या. सदर बैठकीला विधानपरिषद उपसभापती, स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला व मार्गदर्शन केले.

सोबतच पिंपरी चिंचवड सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री बहिवाल यांनी सर्व महिलांना उत्सवाच्या घ्यावच्या सूचना केल्या. यावेळी सूत्रसंचालन विभावरी कांबळे यांनी केले तर आभार झेलम जोशी यांनी मांडले. स्त्री आधार केंद्राने कोरोनाच्या काळात केलेल्या कामाचा आढावा अनिता शिंदे यांनी घेतला. यावेळी आश्लेषा खंडागळे तसेच विविध पोलीस स्टेशन अंतर्गत काम करत असलेल्या महिला सदस्य उपस्थित होते. बैठकीत प्रेरणा कट्टे यांनी सुरक्षा व जन जागृती संदर्भात तर आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यांनी आरोग्याच्या दृष्टीने घेण्याची काळजी संदर्भात संवाद साधला.

Leave a Reply

%d bloggers like this: