Pune – गेल्या 24 तासात 218 नवीन कोरोनाचे रुग्ण

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून आज दोनशेच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 218नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 239रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 97हजार 155 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 86हजार 065इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 13रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 9तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 4रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8953जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 2141रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 211रुग्ण गंभीर आहेत
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 6425 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: